आश्रम धर्माने दिलेली सद्बुद्धि वापरून जीवनाच्या प्रत्येक दशकाच्या थोरवीची आणि जीवनाच्या हेतूची वृद्धि होते परन्तु त्यासाठी नवीन विचार करणे आवश्यक आहे
______________________
सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी
Read this article in:
English |
Hindi |
Tamil |
Spanish |
Gujarati |
Marathi |
लंडनमध्ये राजीवची शाळेतली मित्रमंडळी म्हणजे दंगामस्ती करण्यात वस्ताद, जोमदार, कशाची काळजी नसलेले, आणि भविष्याची चिंता नसलेली मंडळी होत. त्यांच्या मते राजीव एक थंड प्रकृतीचा हुशार, देखणा, आवडेल असा, परन्तु जीवनाचा आनन्द मिळवायला चुकलेला. “आपण आयुष्यात एकदाच तरुण असतो”, जेरेमी त्याला रागावून म्हणाला. “आमच्यासोबत मजा करायला कां येत नाहीस?” पण राजीव एका वेगळ्याच विश्वांत वावरत होता. त्याच्या आईवडिलांकडून त्याने हे शिकून घेतले होते की मानवाचे जीवन हे चार अवस्थांनी मोजले जाते. आणि आपला पुनःपुन: पुनर्जन्म होत असतो. आणि म्हणून आपण अनेकदा तरूण असतो. तो आपली शक्ति महत्वाच्या कामांसाठी राखून ठेवतो, गृहस्थाश्रमाच्या तयारीसाठी आपले ज्ञान आणि चारित्र्य यांचे वर्धन करतो. विशीच्या वयात आल्यानंतर आपण गृहस्थाश्रमी होऊ अशी त्याची कल्पना होती. विनाकारण वेळ वाया घालवण्याची त्याची इच्छा नाही. एका सुसंस्कृत मुलीशी लग्न करून तिच्याबरोबर आपले आयुष्य घालवून आपली सन्तति या जगात आणण्याची त्याची अपेक्षा आहे. राजीव आपल्या वृद्धावस्थेचाही विचार करतो, जेव्हा राजीवने आपले कार्य पूर्ण केलेले असेल आणि अनादिनिधन राजीव आपल्या आत्मरूपात अंग काढून घेवून ब्राह्मीस्थिति प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आपले पृथ्वीवरचे उरलेले आयुष्य घालवेल. राजिवला याची खात्री झालेली आहे की जीवनाच्या प्रत्येक अवस्थेचा एक विशेष उद्देश आहे. आणि प्रत्येक आश्रम त्याच्या आधीच्या आश्रमापेक्षा श्रेयस्कर आहे. सद्यस्थितीत तो शक्य तितका अभ्यास करून मध्येमध्ये थोडावेळ खेळेल असेच त्याने ठरवले आहे.
राजीवची ही योजना मानवाचे आयुष्य चार अवस्थामध्ये ज्यांना आश्रम म्हणतात त्या अवस्थामध्ये विभागलेले असते या हिन्दुधर्माच्या परंपरेवर आधारित आहे. हे विभजन, ज्याला आश्रमधर्म म्हणतात, ते आयुष्याच्या या चार आश्रमातून वाटचाल होत असतांना शरिर, मन आणि भावना यांचा विपाक होण्याचे हे एक नैसर्गिक प्रदर्शन आहे. हा आश्रम धर्म सहस्रावधि वर्षापूर्वी निर्माण करण्यात आला आणि धर्मशात्रात त्याचे पूर्णपणे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. आपले आयुष्यातील कर्तव्य तारुण्य, प्रौढावस्था, वयस्क अवस्था आणि वृद्धावस्था या अवस्थामध्ये अगदी भिन्न असते हे त्यात प्रकर्षाने दाखवून दिले आहे. मैत्रेयी उपनिषदात म्हटले आहे: “सांप्रत आश्रमातील कर्तव्याचे पालन करणे हाच एक नियम आहे. इतर त्याच्या शाखा आहेत. कर्तव्य केल्यानेच मानवाची प्रगति होते. उलट मार्गाने गेल्यास अधोगति होते.”
डॉ राधाकृष्णन् यांनी आपल्या “हिन्दु धर्माचा जीवनाबद्दल दृष्टिकोन” (The Hindu View of Life) या ग्रन्थात सारांशाने असे व्यक्त केले: “हे चार आश्रम- ब्रह्मचर्य अथवा शिक्षणाची अवस्था, गृहस्थ अथवा संसारी, वानप्रस्थ अथवा सामाजिक बन्धनांची ढिलाई करणे, आणि संन्यास अथवा वैराग्य आणि मुक्तीची प्रतिक्षा करणे – यांनी असे दाखवण्यात येते की हे जीवन चातुर्वर्णाश्रमातून एका सनातन जीवनाची यात्रा आहे.
जाति आणि लिंगभेद यांचा विचार न करता सर्व हिन्दु धर्मीयांसठी हा दृष्टार्थ हजारो वर्षापूर्वी जेवढा महत्वपूर्ण आणि मौल्यवान होता तेवढाच आजही आहे. परन्तु ह्या प्राचीन वर्णनांचे आधुनिक जीवनासाठी परिपूर्ण रुपान्तर कदाचित् होणार नाही. भारतातल्या वैदिक काळापासून समाज आता खूपच बदललेला आहे. उदाहरणार्थ, ५० वर्ष वयाच्या व्यक्तीला अन्नासाठी भिक मागत जंगलात जाऊन वानप्रस्थी होणे शक्य नाही. एकविसाव्या शतकातला समाज हे मान्य करणार नाही. काही देशात तर हे वानप्रस्थी स्वतःचे घर नसलेले व्रात्य, त्यातून भुकेले, लोक समजून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येईल. जीवनाच्या या नैसर्गिक परिणामवादाच्या सद्बुद्धिचा वर्तमान हिन्दु धर्मीयांनी उपयोग करून घेण्यासाठी याचे थोडे पुन्हा विवरण करायला हवे. सुरुवातीला या आश्रमांचे पारंपारिक वर्णने बघु या.
ूप्रथम आश्रम आहे ब्रह्मचर्य, विद्यार्थ्याचे जीवन. या आश्रमातील लोकांना ब्रह्मचारी, दिव्य आचरण करणारे, असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षापासून एकोणीस ते वीस वर्षापर्यन्त बारा वर्षाचा हा काळ असतो. विद्यार्थी गुरुकुली राहायचा आणि धर्मग्रन्थ, तत्वज्ञान, विज्ञान आणि तर्कशास्त्र यांचा अभ्यास करायचा. वैदिक पद्धतीने यज्ञ कसा करायचा हे देखील त्याला शिकवण्यात यायचे. ब्रह्मचार्याकडून वर्तणुकीच्या अत्यन्त कडक नियमांचे पालन अपेक्षित होते. ब्रह्मचर्य, सत्यवचन, भाषामाधुर्य, शारिरिक तप, उदाहरणार्थ, थंड पाण्याने स्नान, आणि रात्री मिताहार. गुरुची सेवा आणि घरकाम हेही या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे अंग होते.
दुसरी अवस्था आहे संसारी व्यक्तीची. गृहस्थाश्रम आणि या आश्रमातल्या लोकांना गृहस्थी (गृहस्थाश्रमी) म्हणतात. शिक्षण पूर्ण करून स्वगृही परत आल्यावर या विद्यार्थ्याने लग्न करावे, स्वतःचे कुटुंब वाढवावे, सद्धर्माने कार्य करून आपल्या बायकोमुलांचे पोषण करावे, आपल्या आईवडिलांना मदत करावी, आणि धर्मादायासाठी उदारहस्ते दान करवे अशा अपेक्षा असत. त्याच्या धार्मिक कर्तव्यात धर्मग्रन्थांचे अध्ययन आणि दैनिक वैदिक यज्ञ यांचाही समावेश होता.
ितिसरी अवस्था आहे वानप्रस्थ. घरदार, कुटुम्ब सोडून वनात जाऊन एकान्तात राहणे आणि ध्यान करणे यांची. या लोकांना वानप्रस्थी, वनात राहणारे, म्हणतात. शास्त्र असे सांगते की सर्वसाधारणपणे वयाच्या ५० ते ५५ वर्षी, नातवंडांचा जन्म झाल्यानंतर, गृहस्थी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवून वनात निवृत्त होतो. त्याची पत्नी त्याच्याबरोबर तपस करायला तयार असेल तर तो तिला बरोबर घेऊन जातो अथवा तिला आपल्या मुलंजवळ सोडून जातो. तेथे जीवनाच्या अन्तिम अवस्थेसाठी तयारी करण्याच्या उद्देशाने त्याने रोज यज्ञ करावा, ब्रह्मचर्य पाळावे, आणि आपले जीवन परमेश्वराचा अध्यास करण्यास वाहून टाकावे, यांतच आपले दिवस घालावयाचे असतात.
धर्मग्रन्थात दिलेली चौथी अवस्था आहे संन्यास, सर्वसंगपरित्याग करणे. या आश्रमतल्या लोकांना संन्यासी म्हणतात. जेव्हा वानप्रस्थीला पुरेशी आत्मशक्ति मिळून आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करून त्याची भिक्षुकाचे जीवन जगण्याची तयारी झाली की आपल्या पत्नीची काळजी आपल्या मुलांवर सोपवून वानप्रस्थी संन्यासाचा स्विकार करतो. या आश्रमात त्याने जागोजागी फिरून अन्नाची भीक मागणे, जपजाप्य, ध्यान, इष्टदेवतेची पूजा, आणि धर्मग्रन्थांवर अनुध्यान ह्या गोष्टी करवयाच्या असतात.
यानंतर या प्राचीन आश्रमांच्या वर्णनांचे सद्य परिस्थितीत कसे योजन करता येईल याचा विचार करतांता माझे गुरु शिवाय शुभ्रमुनीयस्वामी यांनी अशी विचारणा केली की प्रत्येक आश्रम स्त्रीपुरुष दोघांनाही लागू पडेल असा चोवीस वर्षांचा काळ असतो. आयुष्याचे पहिले २४ वर्ष ब्रह्मचर्य, गृहस्थ वयाच्या २४ ते ४८ वर्षापर्यन्त, वानप्रस्थ वयाच्या ४८ ते ७२ वर्षापर्यन्त आणि वयाच्या ७२ व्या वर्षानंतर संन्यास.
ॄब्रह्मचर्याचे उद्देश आजही तेच आहेत परंतु काही बाबतीत, उदाहरणार्थ, विद्याथ्याने गुरुच्या घरी राहणे, ते लागू पडत नाहीत. खरेतर तारुण्यात जो व्यवसाय करायचा असेल त्यातच विद्यार्थी शिक्षण घेतील. धर्मिकतेसाठी हिन्दुधर्माची मूलतत्वे शिकायला हवीत आणि त्याबरोबर मंत्र पाठ करायचे आणि घरच्या देवघरात देवाची पूजा करायला शिकले पाहिजे. वैदिक यज्ञाच्या ऐवजी आधुनिक काळात आता पूजा करण्याची प्रथा सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, ब्रह्मचर्य आणि इतर योग्य गुण शिकवले पाहिजेत.
गृहस्थाश्रमाचे वर्णनानेही काळाची परिक्षा यशस्वीरित्या दिली आहे. याचा प्रमुख केन्द्रबिन्दु आहे लग्न आणि मुलांना वाढविणे वर्त्तविणे. स्वतःच्या व्यवसायातून समाजसेवा करणे, धनार्जन करणे, वृद्ध लोकांची काळजी घेणे, आणि दान करणे. दैनिक पूजा घरी केली जाते आणि आदर्शाने संपूर्ण कुटुम्ब ह्या पूजेला उपस्थित असते. आज गृहस्थाश्रमी आपल्या मुलांसाठी हिन्दुधर्माचा प्रमुख शिक्षक असतो. प्राचीन काळी ह्या कर्तव्याचे पालन गुरु करायचे. हा गृहस्थाश्रम स्वतःच्या व्यवसायाची आणि कुटुम्बाची प्रगति करत असतांना बाहेरच्या जगात भरपूर काम करण्याचा काळ आहे.
वानप्रस्थाश्रमाची आधुनिक व्याख्या करतांना जुन्या व्याख्यांचा पुन्हा विचार करावा लागतो. वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी वनात जाऊन राहणे बहुतेकांना जमणार नाही. त्या ऐवजी माझे गुरु या काळाचे नवीन पीढीला एक सहज प्रौढ उपदेशक म्हणून मदत करण्याचा काळ असे वर्णन करतात. ब्रह्मचर्याश्रमी आणि गृहस्थाश्रमी वानप्रस्थ्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवाचा फायदा करून घेतात. उदाहरणार्थ, या वयाचे अनेक हिन्दु लोक युवकयुवतींच्या संघाला प्रौढत्वाने उपदेश करणे, बालबालिकांना हिन्दु धर्म शिकवणे, देवालयांच्या जिम्मेदार सभेचे सदस्य होऊन कार्य करणे किंवा लौकिक संघटनांमध्ये पुढाकाराचे कार्य करणे, इत्यादि कामे करतात. व्यवसाय आणि सामाजिक जीवनातून हळुहळु निवृत्त होतांना आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचा हा काळ आहे.
सन्यासाश्रमाचे क्षेत्रही आता वाढले आहे. आधुनिक हिन्दु लोकांपैकी फारच थोडे लोक निवृत्त झल्यानंतर संन्यास घेतात, या विश्वाचा त्याग करतात, आणि ज्यांनी आपल्या वयाच्या विशीत ते तिशीत भिक्षुकी घेतली होती अशा हजारो साधु संन्यासांमध्ये फिरतात. अविवाहित, विधुर, आणि विधवा लोकांना हे करणे शक्य आहे, भरतात काही भागात, जेथे समाज अशा स्त्रीपुरुषांचा मान राखून त्यांची काळजी घेतो, तेथे हे शक्य आहे. परन्तु जगात बहुतांशी याबद्दल समज नाही आणि मान्यताही नाही.
वयाच्या ७२ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या अनेक हिन्दु लोकांनी मला आयुष्यात पुढे वेगळे काय करावे हा प्रश्न विचारला आहे. माझा त्यांना असा सोपा सल्ला आहे की त्यांचे जे अनुष्ठान चाललेले असेल तेच त्यांनी अधिक कडकपणे पाळावे. आपण जर रोज ३० मिनिटे पूजा करीत असाल तर ती एक तास करा. तुम्ही रोज अर्धा तास ध्यान करीत असाल तर ते एक तासापर्यन्त वाढवा. तुम्ही वर्षातून दोन आठवडे यात्रेला जात असाल तर ती यात्रा एक महिन्यापर्यन्त वाढवा. एकदा या बदलांची सवय झाली की आपण साहाजिकच आपल्या अनुष्ठानांवर जास्त वेळ देण्यास प्रवृत्त होतो. वयाच्या ७२ व्या वर्षानंतर शारिरिक शक्तीचा ह्रास व्हायला सुरुवात झाली की अन्तर्मुख होऊन जगाच्या घडामोडीतून आपले अंग काढून घ्यायची वेळ आली आहे असे समजावे.
माझ्या गुरुंनी या तिसऱ्या आणि चौथ्या आश्रमाचे सद्यस्थितीत उपयुक्त ठरेल असे वर्णन केले आहे, ते असे: “जीवनाच्या या उत्तरांगात संसारी भक्तजनांना आपली साधना अधिक तीव्र करण्याची संधि मिळते आणि आपण पहिल्या दोन आश्रमांत मिळविलेले अनुभव, ज्ञान, सद्बुद्धि या गोष्टी समाजाला परत करू शकतो. वानप्रस्थाश्रम वय ४८ ते ७२ हा एक अत्यन्त महत्वाचा आश्रम आहे. कारण यावेळी तुम्ही ब्रह्मचारी विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे यांत त्यांचे जीवन हव्या त्या मार्गाने जावे यासाठी उत्कृष्टतेची प्रेरणा देऊ शकता. नंतर वयाच्या ७२ व्या वर्षापासून आपल्याला जो काही साक्षात्कार झालेला असेल त्याचा अनुभव अधिक गाढ करून उरलेले आयुष्य आनंदात घालवावे.”
Four dynamic stages:
1) As a student, gaining knowledge in math, science and other fields;
2) supporting and raising a family;
3) as a grandparent, semi-retired, devoting more time to religious pursuits and community programs while guiding one’s offspring and their children;
4) as the physical forces wane, withdrawing more and more into religious practices.
1. Student, age 12–24 Brahmacharya Ashrama |
2. Householder, age 24–48 Grihastha Ashrama |
3. Senior Advisor, age 48–72 Vanaprastha Ashrama |
4. Religious Devotion, age 72 & onward Sannyasa Ashrama |