एका सूक्ष्म विषाणूने या जगतावर एक नवीन जीवनपध्दति लादलेली आहे. आपण त्याला कसा प्रतिसाद देतो त्यावर आपले कुटुम्ब आणि घर यांचे सीमांकन करण्यात येईल.
सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी
English |
Tamil |
Kannada |
Hindi |
Portuguese |
Marathi |
जगाच्या अनेक भागांत कोव्हिड-१९ च्या सार्वदेशिक साथेमुळे तेथल्या सरकारांना संचारबंदी करून घरीच राहण्याच्या नीतीचे धोरण प्रस्थापित करावे लागले आहे. त्यामुळे लोकांना नोकरी देणार्या अनेक व्यवसायांना आणि विद्यालयांना त्यांच्या व्यवसायांची आणि विद्यालयांची रचना बदलावी लागली जेणेकरून त्यांचे कर्मचारी आणि विद्यार्थी घरून व्युत्पादकरित्या काम करू शकतील. आता स्पष्ट होत आहे की याचे काही अनपेक्षित परिणाम झालेले आहेत, त्यापैकी एक म्हणजे या तात्पुरत्या घरून काम करण्याच्या योजनेचे परावर्तन एका कायम घरून काम करण्याच्या पध्दतीत समाजाच्या एका मोठ्या भागासाठी होण्याची शक्यता आहे. खालील दोन प्रमुख उदाहरणे या दिशेने जात असलेला कल दाखवतात.
फोर्बज् या मासिकाने १३ मे २०२० च्या अंकातील एका लेखात हे व्यक्त केले: “ट्विटर चे प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO), यांनी आपल्या कर्मचार्यांना या कोव्हिड-१९ मुळे प्रेरणा मिळालेल्या, प्रकृतिरूपांतर करणार्या प्रतिपादनेत आपल्या कर्मचार्यांना कळविले की “ते आता आपल्या घरूनच निरंतर काम करू शकतील. हा पर्याय सर्वांनाच उपयोगाचा नाही हे लक्ष्यात असल्यामुळे त्यांनी जे परंपरागत कार्यालयाच्या रचनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात त्यांच्यासाठी आपले दार उघडे ठेवले आहे. याचा निर्णय त्यांनी आपल्या कर्मचार्यांवर सोपविला आहे. त्याच्या कचेर्या पुन्हा उघण्याचे वेळापत्रक बघितले तर, आणि घरून काम करण्याची सुसंधी मिळत असल्यामुळे, ह्या नवीन कार्यक्रमाचा परिणाम असा होण्याची मोठी शक्यता आहे की ट्विटरचे बहुसंख्य कर्मचारी आगामी भविष्यकाळांत दूरूनच काम करतील – किंवा कायमच.”
न्यू यॉर्क टाईमस् या वर्तमान पत्राने २१ जून २०२० रोजी लिहिले: मार्क् झुकरबर्ग, “फेसबुक” चे प्रमुख कार्यकारी अधिकारी, यांनी आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या फेसबुक पत्रावर प्रत्यक्ष चालू असतांना दाखविलेल्या एका बैठकीत सांगितले की एका दशकाच्या आत त्यांच्या संस्थेच्या ४८,००० कर्मचार्यांपैकी जवळ जवळ अर्धे कर्मचारी घरूनच काम करतील. “असे स्पष्ट दिसून येत आहे की कोव्हिडमुळे आपल्या जीवनात बराच बदल झाला आहे, आणि त्यात आपण आपले काम कसे करतो याचाही समावेश आहे.”
कोव्हिड-१९ मुळे आणखी एक झोक गतीने वाढतो आहे तो आहे “दूरदर्शन औषधोपचार” (telemedicine) याचा. कोव्हिड-१९ च्या या संघर्षात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यांनी या प्रकारच्या दूरदर्शन औषधोपचारांचा उपयोग खूपच वाढविलेला आहे. या दूरदर्शन औषधोपचारांचा उपयोग अनेक प्रकल्पांत शीघ्रगतीने वाढत राहणार आहे. “टेक रिपब्लिक” या वृत्तपत्रात १९ मे २०२० या दिवशी प्रसिध्द झालेल्या लेखात असे म्हटले आहे: “कित्येक वर्षांपासून आम्ही चिकित्सकांना सांगत आहोत की इ.स. २०२४ च्या आगमनापर्यंत तपासणीसाठी प्रत्यक्ष भेटीपेक्षा अशा अप्रत्यक्ष भेटी जास्त होतील. कोव्हिडमुळे हा दिवस दोन्, कदाचित् तीन वर्षांनी पुढे आणला. आम्हाला माहित आहे की काही चिकित्सक आपल्या घरून आपला व्यवसाय करीत आहेत.”
घरून काम करण्याच्या या कलाकडे आपण आता हिंदु दृष्टिकोनातून पाहुया. दूरून आपले काम केल्याने आपल्या त्यासाठी अधिक वेळ मिळतो, कारण कार्यालयात जाण्याची गरज नसते. अनेक लोक आपल्या कार्यालयापासून किंवा विद्यालयापासून बरेच दूर वास्तव्य करतात आणि दररोज तासंतास तिथे जाणायेण्यात घालवतात. दिवसात मिळालेल्या या तासांत आम्हाला आपल्या जीवनात सुधारणा करण्याचा चार संधी दिसत आहेत.
आपल्या घरातील देवघर उत्कृष्ट करणे
प्रथम: मिळालेल्या वेळापैकी काही वेळ आपले देवघर समृध्द करण्यापेक्षा अधिक कोणती गोष्ट असू शकते. हिंदु घरात परंपरागत एक विशेष कक्ष वेगळा ठेवला असतो आणि तेथे मंदिरासारखे वातावरण कायम निर्मित केलेले असते, जेथे आपण पूजा करतो, धर्मग्रंथांचे पठन करतो, ध्यान करतो, साधना करतो, भजन करतो, आणि जप करतो. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, यांनी या घरातल्या देवघराच्या महत्वावर त्यांचा अनेक व्याख्यानांत भर दिला आहे. त्यांना ते देवघर कसे प्रेरणात्मक आणि स्फूर्ति देणारे होईल हे ज्ञात होते. त्यांच्या लेखनातला हा एक उतारा: “सर्व हिंदु लोकांचे संरक्षक देव असतात जे अंतर्लोकात वास्तव्य करतात आणि तेथून त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचे रक्षण करतात. देवळातल्या महादेवांच्या दर्शनासाठी जे भक्त जातात त्यांच्या घरी ते महादेव त्यांच्याबरोबर राहण्यासाठी आपले राजदूत पाठवतात.
या कायम स्थायिक अशा पाहुण्यांसाठी एक खोली वेगळी ठेवण्यात आली असते, जेथे हे पूर्ण कुटुम्बीय येऊन बसतात आणि मनांतूनच या सुसंस्कृत जीवांबरोबर, ज्य़ांनी या कुटुम्बाचे पिढ्यान्पिढ्या संरक्षण करायला स्वतःला वाहून घेतले असते, त्यांच्याशी तादात्म्य पावतात. त्या राजदूतांपैकी काही आपले पूर्वज असतात. आपल्या शयनकक्षात, किंवा एखाद्या कपाटात किंवा स्वयंपाकघरातल्या एखाद्या कोपर्यात नाममात्र देवघर यांना आकर्षित करण्यास पुरेसे नाही. माननीय पाहुण्याला आपण त्याला कपाटात जागा देऊन किंवा स्वयंपाक घरात झोपायला जागा देऊन त्या पाहुण्याला आपले स्वागत झाले आहे असे वाटण्याची, आपली कदर करतात किंवा आपल्यावर प्रेम करतात अशी अपेक्षा करणे अनुचित आहे. सर्व हिंदूंना लहानपणापासून शिकवण्यात येते की अतिथि देव आहे, आणि ते कोणीही पाहुणा भेटायला आला की त्याला राजेशाही पध्द्तीने वागवितात. हिंदु लोक, ते जेव्हा त्यांच्याघरी कायम वास्तव्य करायला येतात, तेव्हा देवांना देव मानतात, आणि उपदेवांनाही देव मानतात. आई, मुली, मावश्या/आत्या, वडिल, मुले, काका/मामा, हे सर्व आपापल्या घरात पूजा करतात कारण हिंदु गृह हे जणू शेजारच्या देवळाचाच विस्तारलेला भाग आहे असे समजल्या जाते.”
घरातल्या देवघरातील स्पंदने स्थानिक मंदिराला भेट देऊन दृढ करता येतात. त्यानंतर तुम्ही जेव्हा घरी परत येता, तेव्हा देवघर असलेल्या खोलीत एक तेलाचा दिवा लावा. ही कृती देवळातले धार्मिक वातावरण तुमच्या घरात घेऊन येईल, अद्भुतरित्या त्या देवळातल्या देवांना थेट तुमच्या देवघरात घेऊन येईल. अंतर्लोकातून ते तुम्हाला आशीर्वाद देण्यास आणि मार्गदर्शन करण्यास, आणि घरातल्या धार्मिक शक्तीच्या क्षेत्राला दृढ करण्यास समर्थ असतात.
कौटुम्बिक स्नेहबंध
दुसरी संधी म्हणजे कामासाठी जाणेयेणे करावे न लागल्यामुळे आपल्या मुलांबरोबर उत्तमप्रकारे वेळ घालविण्यास मिळणे ही आहे. याशिवाय, घरून काम करायला मिळाल्यामुळे तुमचे वेळापत्रक परिवर्तनशील असू शकते, जेणेकरून जेव्हा मुले शाळेत असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायातील प्रगतीवर लक्ष्य केंद्रित करता येते आणि मुले घरी असतांना आपल्याला मोकळे ठेवता येते. गुरुदेवांनी या कुटुम्बाच्या संमेलनावर फार मोठा भर दिला आहे आणि दर आठवड्यात “घरी सोमवार सन्ध्याकाळ” संमेलन करणे सुचवले आहे. त्यांचे याचे वर्णन आहे: “हिंदूंसह ही सोमवार संध्याकाळ अनेक धर्म पाळतात. शिवाचा दिवस असलेल्या सोमवारी संध्याकाळी एक उत्तम भोजन करा, खेळ खेळा आणि एकमेकांच्या सद्गुणांची तोंड भरून प्रशंसा करा. या संध्याकाळी टेलिव्हिजन सुरु करावयाचे नसते (आणि सद्यकाळी सामाजिक माध्यमे वापरावयाची नसतात.) या दिवशी ते कुठलेही प्रश्न सोडवत नाहीत. ते फक्त एकमेकांवर प्रेम करतात आणि लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला मत असते. आठवड्यातून एक दिवस आईबाबा घरी असण्याची अपेक्षा असण्याचा हा कुटुम्बाच्या एकत्रीकरणाचा दिवस असतो. याचा अर्थ असा नाही की सोमवारी जमले नाही तर हे मंगळवारी किंवा इतर कुठल्याही दिवशी होईल. कुटुम्बाच्या एकत्रीकरणासाठी नेहमीच सोमवार संध्याकाळ असते आणि सर्वांना त्यांचे जीवन त्याप्रमाणे समायोजित करावे लागते.”
गुरुदेव या प्रकारच्या उपक्रमाचे खरे धन असे वर्णन करतात. “त्यांच्या व्यवसायप्रगतीच्या प्रयत्नामुळे हे अशक्य़ असल्याचे दिसून येते. आजकाल लोकांना असे वाटते की आरामशीर जीवनासाठी त्यांना दोन किंवा तीन उत्पन्न असणे आवश्यक आहे. पैसा कधीकधी लवकरच मिळविता येतो आणि गमावला जातो. जेवढा लवकर मिळतो, तेवढाच अनेकदा लवकरच गमावल्या जातो. परन्तु संपत्ति काय आहे? संपत्ति हा अनेक पैलूंचा हिरा आहे. या संपत्तीच्या हिर्याचा एक पैलू आहे पैसा, पण तेवढा एकच नाही. एक सुखी कुटुम्ब, जे एकमेकांच्या संगतीत आनन्द मिळवितात- ती एक मोठी संपत्ति आहे. एकत्र कार्य करणे आणि एकत्र कार्य करण्यात आनन्द मिळविणे ही दुसरी संपत्ति आहे.
जीवनात समतोलता निर्माण करणे
तिसरी संधी आहे ती आपल्या जीवनात संपन्नता आणि समतोलपणा आणणे याची. जाण्यायेण्यात जाणारा वेळ इतर काही महत्वाच्या कामांना, उदाहरणार्थ, अर्ध्या तासाच्या व्यायामाला, ढकलून देऊ शकतो. आधुनिक जीवनाचा तणाव व्यायामाने आणि घरी केलेल्या हटयोगासनाच्या साधनेने, जी साधना जवळजवळ सगळ्याच कार्यालयात करणे अशक्य आहे, त्या साधनेने कमी केला जाऊ शकतो. तणाव ध्यानधारणेच्या सोप्या तंत्रानेही कमी केला जाऊ शकतो. अधिक वेळ अधिक आरोग्यदायी भोजन तयार करण्यास आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, सहली आणि शैक्षणिक साहसी कार्य करण्यास मुभा देतो.
समाजसेवा
चौथी सुसंधी आहे ती आपल्या उपलब्ध वेळ समाजकार्यासाठी देण्यासाठी. सर्व कुटुम्बियांना ज्यात भाग घेता येईल असे सेवा प्रकल्प प्रस्थापित करता येतात. सेवेचे, निष्काम कृत्याचे महत्व, कुमारांच्या मनावर ठसवून देण्यासाठी ती स्वतः करून दाखविणे याच्यासारखा दुसरा मार्ग नाही. सेवा करण्याचा एक मोठा फायदा आहे की ती सेवा आपल्या जीवात्म्याला कमी लेखून आपल्या मनावरच्या भौतिकवादाच्या महत्वाला, आपल्या स्वतःच्या कुटुम्बासाठी संपत्ति जमविण्याच्या एकमेव उद्देशाला, बाजूला करते. असे सुचवण्यात येते की जर औपचारिक हिंदु सेवा प्रकल्प तुमच्या परिसरात नसतील तर त्यांचा शोध तुमच्या समाजात वाढवून पर्यावरण सुधारणा, आपत्तिनंतर मदत, कपडे, खाद्यपदार्थ, आणि गरजू लोकांना शुश्रुषा यांसारखी कार्ये शोधावी. इ.स. २००१ मध्ये गुजरातम्ध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख स्वामी महाराज यांनी आपल्या अनुयायांना असा सल्ला दिला: “जेव्हा लोक कठीण परिस्थितीला आणि दुःखाला तोंड देत असतात तेव्हा आपली भारतीय परंपरा त्यांचे सांत्वन करण्याची आहे. आम्हाला असे जाणवते की मानवाची सेवा केल्याने आपण प्रत्यक्ष भगवंताचीच सेवा करीत आहो.”
अर्थातच घरून काम केल्यामुळे अनेक संभवनीय गोष्टी निर्माण झाल्या आहेत. आम्ही आशा करतो की या चार कल्पना तुमच्या सर्जनशील विचारशक्तीला चालना देऊन तुमच्या घरातील आध्यात्मिकता वाढवण्यासाठी, तुमचे आरोग्य वृध्दिंगत करण्यासाठी, आणि स्वतःच्या कुटुम्बाचे स्नेहबंध दृढ करत असतांना विस्तीर्ण समाजाची सेवा करण्याच्या नवीन कल्पनांसाठी उत्प्रेरक ठरतील.